धर्मगौडा यांच्या मृत्यूच्या उच्च्स्तरीय चौकशीची लोकसभा अध्यक्षांची सूचना

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करावी, असा सल्ला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारला दिला आहे.

६४ वर्षांचे धर्मेगौडा मंगळवारी चिकमंगळुरू जिल्ह्यात रेल्वेरूळावर मृतावस्थेत सापडले होते. त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. ते धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार होते.

 

सभागृहात १५ डिसेंबरला सभापतींवर अविश्वास ठराव मांडण्यावरून धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. या घटनेचा संदर्भ धेऊन बिर्ला म्हणाले, ‘सभागृहातील घटना दुर्दैवी होती. ते पीठासनावर असताना अशा प्रकरचा हल्ला होणे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे. त्यांच्या मृत्यूची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे.’

कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह चिकमंगळुरूमध्ये कादूरनजिक एका रेल्वे ट्रॅकजवळ आढळला होता. धर्मेगौडा यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक सुसाईड नोटही आढळली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही.

Protected Content