राज्यात अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे

रावेर  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांना भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीनेप्रा. संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली  संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकांना अनुसूचित जमातीचे  जात प्रमाणपत्र मिळावे असे निवेदन देण्यात आले.

 

दिल्ली  येथे केंद्रीय सडक परिवहन राजमार्ग, जहाजराणी , जल संसाधन मंत्री नितीन गडकरी  यांना सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाण पत्र सरसकट मिळण्याची मागणी करण्यात आली. तसेच सर्वोच्च  न्यायालयाने  ६ जुलै २०१७ रोजी बहिरा केस संदर्भात दिलेल्या निर्णयाचा चुकीचा अर्थ  काढून आदिवासी विभाग व सामान्य  प्रशासन  विभागाने षडयंत्र करून हा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागु करून दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी  काढलेला अधिसंख्य पदाचा शासन निर्णय  तत्काळ रद्द् करून  कर्मचाऱ्यांना पुर्वरत करण्यात यावे. उच्चन्यायालय औरंगाबाद यांनी दि. ७ डिसेंबर २०२१  रोजी,अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी यांना  तात्पुरते  पेन्शन देण्याचे आदेश देऊन संबधित  प्रशासन त्या निर्णयाची अंमलबजवानी न करता  पेन्शन  देण्यात  टाळाटाळ करीत आहे. तरी उच्च न्यायालयाच्या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करून त्यासर्व कर्मचाऱ्यांना  तात्काळ पेन्शन , ग्रज्युटी  व इतर लाभ देण्याची कारवाई करावीआदी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील सहकारी सोसायटी किंवा सहकारी संस्थे मार्फत  डिझेल  पेट्रोल पंप  कांझुमर  तत्वावर २५  ते ३० वर्षा पासुन  चालविण्यात येत होते. परंतु फेबुवारी २०२२ पासुन डिझेल, पेट्रोल प्रति लिटर १० रुपये जास्त दराने  महाराष्ट्र शासनाचे डीलर सहकारी संस्था यांना देत असल्या कारणाने  या पेट्रोल पंपावर कोणीही लोक डिझेल पेट्रोल घेण्यासाठी येत नसुन सहकारी सोसायटी संस्था मधील कर्मचारी यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे.  त्यांना कमी पगारावर काम करावे लागत आहे. सहकारी संस्था मर्यादित संस्था यांच्या कोट्यवधीच्या  रुपयाचे भांडवल त्यात अडकुन पडले असुन तरी संपुर्ण महाराष्ट्रात एकच दराचे भावाने  डिझेल पेट्रोल मिळावे ले त्या प्रसंगी गडकरी याच्यासी चर्चा करताना त्यांनी सांगितले की, मी संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळणे बाबत राष्ट्रपती महोदय, नरेंद्रजी मोदी पंतप्रधान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याबावर प्रयत्न करतो तसेच हरदीप एस  . पुरी केंद्रिय पेट्रोलियम मंत्री यांच्या कडे पाठपुरावा करतो.असे गडकरी साहेब यांनी सांगितले गडकरी साहेब यांना निवेदन देताना सर्व शक्ती सेना राष्ट्रीय अध्यक्ष निरज जी सेठी साहेब सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.  संजय मोरे प्रल्हाद भाऊ बोंडे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सहकार आघाडी किसन महाजन सर्व शक्ती सेना जळगाव जिल्हा अध्यक्ष सहकार आघाडी प्रेमचंद मनुरे जीवन प्राधिकरण सहाय्यक अधिक्षक अभियंता जळगाव   दिनेश गांधी सर्व शक्ती सेना राष्ट्रीय सचिव  राजवैशिस्ट  सर्व शक्ती सेना राष्ट्रीय संघटक प्रविण मनुरे अगनेल कोट्वाल इ ईत्यादि उपस्थित होते .  आपला विश्वासू – प्रा. संजय मोरे

Protected Content