आधी जल्लोष, नंतर सिल्वर ओकवर हल्ला

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युजवृत्तसेवा – एसटी कर्मचाऱ्याचा संप मिटल्यावर आधी जल्लोष करण्यात आला आणि दुपारी हे आंदोलक सिल्वर ओकवर कसे पोचले, आणि त्यांनंतर पुन्हा आंदोलक सीएसटीएमवर ठिय्या मारून बसले आहेत, या हाय होल्टेज ड्रामामागील मास्टरमाईंडला शोधून काढण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानावर शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेकडो नव्हे हजारो एसटी आंदोलक कर्मचारी कसे पोचले, धडक मोर्चा नेत चप्पल फेक सारखा हायव्होल्टेज ड्रामा झाल्यानंतर मध्यरात्रीनंतर आझाद मैदान व पुन्हा शनिवारी पहाटेच्या सुमारास मुंबई सीएसटीएम रेल्वे स्थानकावर आंदोलकांचा ठिय्या अचानक कसे घडले? हे आंदोलक सिल्व्हर ओकवर आलेच कसे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्या प्रकारामागे नक्कीच कुणीतरी या गर्दीच्या पाठिशी होते, चिथावणीखोर आणि भावना भडकवणारी भाषा ? हे शोधून काढणे पोलीस विभागाचे काम आहे.

दरम्यान, आधी जल्लोष करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर सिल्व्हर ओकवर अचानक आले कसे ? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जल्लोष होतो, मिठाई वाटली जाते, यश मिळाले असे दाखवले गेले, आणि तरीही सिल्व्हर ओकवर जाण्याचे कारण काय? असा प्रश्न असं अजित पवार यांनी उपस्थित केला.

या सर्व गोंधळावर अजित पवार यांनी पोलीस यंत्रणा या सर्व प्रकरणात कमी पडल्याचे म्हटले आहे. पोलीस यंत्रणेने बारीकसारीक खडानखडा वेगवेगळी माहिती मिळवण्याचे काम आहे, पण पोलीसच यात कमी पडले हे सत्य आहे. कारण आंदोलक, मीडियाचे देखील कॅमेरे सिल्वर ओक पर्यंत पोचतात, तिथे पोलीस यंत्रणेला याची माहिती का मिळाली नाही यात नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे! याचा शोध पोलीस घेतीलच असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी मत व्यक्त केले आहे.

Protected Content