सेंद्रिय शेतीत माल वाहतूकीसाठी शेतकऱ्याला चारचाकी वाहन अनुदान

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत माल वाहतूकीसाठी चारचाकी वाहन तालुक्यातील पिंप्री.बु.प्रदे येथील शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत कृषी कार्यालय येथे अनुदानाचे वाटप करण्यात आले. 

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान कृषी विकास योजना सेंद्रिय शेती अंतर्गत तालुक्यातील पिंप्री.बु.प्रदे येथील शेतकरी अशोक मांगु पाटील यांना माल वाहतूक चारचाकी वाहनासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान आज देण्यात आले. साईकृपा शेतकरी गट पिंप्री.बु.प्रदे या गटाला हे अनुदान देण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा ज्ञानेश्वर पवार, मंडळ कृषी अधिकारी सुर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक चव्हाण, कृषी सहायक पगारे आदी उपस्थित होते. सेंद्रिय शेतीत माल वाहतूकी दरम्यान शेतकऱ्यांना होत असलेले त्रासाला आता आळा बसायला मदत होणार आहे. असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी चंद्रशेखर साठे यांनी केले.

 

 

 

 

Protected Content