मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- निलेश राणे यांची मागणी

मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयला देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. भाजपा नेत्यांनी न्यायालायच्या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

निलेश राणे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनामा मागितला पाहिजे. आंधळा आणि बहिरा पण सांगेल की मुंबई पोलिसांवर मागच्या ६५ दिवसांत कोण दबाव टाकत होतं. तसेच एवढा दबाव फक्त मुख्यमंत्री कार्यालय टाकू शकतं, असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे राजीनामा पण मुख्यमंत्र्यांनीच दिला पाहिजे, असं निलेश राणे यांनी सांगितले.

कालच निलेश राणेंचे बंधू आमदार नितेश राणे यांनी अब बेबी पेंग्विन तो गियो… इट्स शो टाइम असे ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. यानंतर आज निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Protected Content