राज्यपालांनी मंत्रीमंडळाला शपथविधी देऊ नये ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला कोणताही दिलासा दिलेला नाही. तर खंडपीठासमोर याचा निकाल लागणार आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ ही बेकायदेशीर असून राज्यपालांनी मंत्रीमंडळाला शपथविधी देऊ नये अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी आज दुपारीच आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देणार असल्याचे घोषीत केले होते. याच संदर्भात सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

यानंतर संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेचे महासचिव खासदार अनिल देसाई यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहले आहे. यात त्यांनी काल सुप्रीम कोर्टाने अपात्रता प्रकरणी जैसे थे असा आदेश दिल्यामुळे फुटीर गटाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. उलटपक्षी हे सरकारच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली शपथ आणि हे सरकारचे बेकायदेशीर आहे. यामुळे राज्यपालांनी या प्रकरणी न्यायालयात निकाल लागेपर्यंत नवीन मंत्रीमंडळाला शपथ देऊ नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली असल्याची माहिती देखील संजय राऊत यांनी दिली.

Protected Content