Home Cities जळगाव शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शाम कोगटा

शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शाम कोगटा

0
137

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेच्या जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शाम कोगटा यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी शाम कोगटा यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. आधी त्यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे विश्‍वासू सहकारी म्हणून ओळखले जाणार्‍या कोगटा यांच्यावर आता विधानसभा क्षेत्रप्रमुखपदाच्या माध्यमातून मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते शाम कोगटा यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर ललित कोल्हे, राजेंद्र चव्हाण, नगरसेवक मनोज चौधरी,नगरसेवक गणेश सोनवणे,नगरसेवक कुंदन काळे,सोहम विसपुते, रमेश पाटील,अनिल भोळे,नवल पाटील, नंदु पाटील आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound