पोहरादेवींचे दर्शन घेऊन उध्दव ठाकरेंचा विदर्भ दौरा सुरू !

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंजारा समाजाचे आराध्य दैवत असणार्‍या पोहरादेवीचे दर्शन घेऊन आज उध्दव ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौर्‍याचा शुभारंभ केला आहे.

उध्दव ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर आहेत. त्यांनी वाशिममधून आपला दौरा सुरू केला. याच्या प्रारंभ त्यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. पोहरादेवीच्या दर्शनानंतर संजय राठोड यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे सभा घेणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस हा संजय राठोड यांचा मतदारसंघ आहे. राठोड कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याविरूध्द ठाकरे गटाने मोर्चेबांधणी केली आहे. याआधीच पोहरादेवीचे महंत हे ठाकरे गटात सहभागी झाले असून ते राठोड यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पोहरादेव देवस्थानावर उध्दव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बंजारा समाजबांधव याप्रसंगी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी काही काळ उपस्थितांच्या सोबत वार्तालाप देखील केला.

Protected Content