चिंचपुरा येथे मेंढपाळांना किराणा सामान वाटप

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी । सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत आत्यंतीक गरज असणार्‍या चिंचपुरा येथील मेंढपाळ बांधवांना जिजाऊ गटातर्फे किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.

सध्याच्या कोरोना या संकटामुळे पूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यातच चिंचपुरा बु. येथील मेंढपाळ करणार्‍या लोकांना किराणा उपलब्ध होत नसल्यामुळे जिजाऊ महिला शेतकरी गटाचा वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून मेंढपाळांना किराणाचे सामान वाटप करण्यात आले जळगांव जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून आलेल्या मेंढपाळांची अन्नधान्याची वाटप शासनाच्या वतिने करण्यात यावी अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते कैलास पाटील व सहकार्‍यांनी केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content