यावल तालुक्यात दोन शहरांमध्ये शिवभोजन केंद्र

यावल प्रतिनिधी । राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता यावलसह तालुक्यातील फैजपूर शहरात शिवभोजन थाली विक्री केंद्राला मान्यता मिळाली आहे.

राज्यातील गोरगरीब नागरिकांना व मजुरांना अत्यंत अल्प दरात जेवण मिळावे या दृष्टिकोनातून शिव शिवभोजन थाली या योजनेअंतर्गत यावल शहर व तालुक्यातील फैजपूर येथे प्रत्येकी १०० थालीभोजन विक्री केंद्रास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबत यावलच्या तहसील कार्यालयात या योजना समितीचे अध्यक्ष तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्यासह चार सदस्य असलेल्या समिती सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीचे सदस्य-सचिव यावल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बबन तडवी, फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश चव्हाण तसेच समिती सदस्य पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निलेश पाटील यांच्या उपस्थितीत यासंदर्भातील एक बैठक आज सकाळी ११ वाजता संपन्न झाली.

या बैठकीत शिव शिव भोजन थाली घेण्यास इच्छुक सामाजिक संस्थांनी व व बचत गटांनी ११ एप्रिल पर्यंत येथील यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे अर्ज सादर करावयाचे आहेत. शिवभोजन थाली केंद्रासाठी आवश्यक असलेल्या अटी व शर्ती शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार असावेत याबाबतचे शासकीय परिपत्रक तसेच सूचना येथील तहसील कार्यालयात पहावयास मिळेल असे येथील तहसीलदार जितेंद्र कुवर व निवासी नायब तहसीलदार आर के.पवार यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content