पाणी पुरवठा सुरळीत करणार : मुख्याधिका-यांचे आश्वासन

 

WhatsApp Image 2019 06 03 at 16.57.19

यावल प्रतिनिधी । शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात मागील एक महिन्यापासुन नळांना फारच कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. म्हणून प्रभागातील नागरिेकांनी पाण्याआभावी हाल होत असल्याची तक्रार यावल नगर परिषदचे मुख्याधिकारी रविन्द्र लांडे यांच्याकडे करण्यात आली.

या संदर्भात माहिती अशी की, सिद्धार्थनगर मधील सार्वजनिक नळांना मागील एक महिन्यापासुन अत्यंत कमी प्रमाणात पाणी येत असल्यामुळे प्रभागातील रहिवाशीं पिण्याचे पाण्यासाठी विविध ठिकाणी डोक्यावर हंडे ठेवुन उन्हात भटकंती करावी लागत आहे. यातच एका नगरसेवकाने बुरुज चौकातीत नगीना मस्जिदच्या शेजारच्या बोळातुन मुख्य जलवाहिनी पाईपलाईनला काही नवीन कनेकशन जोडणी केल्याने, नियमीत मिळत असलेल मुबलक पाणी मात्र नवीन कनेक्शन जोडणी केल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच प्रभागातील नगरसेवक शेख अस्लम शेख नबी यांच्याकडे पाणी समस्याच्या व्यथा सांगितल्यावर त्यांनी महिलांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व मुख्याधिकारी ४ जून रोजी तात्काळ प्रभागातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य जलवाहिनीला बुरुज चौकातुन किंवा पेट्रोल पंपाजवळुन गेलेल्या मुख्य जलवाहीनी पाईपलाईनला नवीन कनेक्शन जोडणी करून मुबलक व सुरळीत पाणी मिळेल, असे आश्वासन नागरीकांना दिले. या निवेदनावेळी सामाजिक कार्यकते अनील जंजाळे, लिंबा पारधे, लक्ष्मण पारधे, बाळु पारधे, लताबाई पारधे, लिलाबाई पारधे, सुंनराबाई पारधे, वंदना पारधे व विमलबाई सुरेश पारधे आदींनी स्वाक्षरी केल्या आहेत.

Add Comment

Protected Content