कांचन नगर येथे एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्था व समाज बांधवाची बैठक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात एकता बहुउद्देशीय शिंपी समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळ आणि समाज बांधवांची रविवारी बैठक घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी एकनाथ बाविस्कर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला गणेश वंदन व संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली. संस्थेचे सचिव सुजित जाधव यांनी मागील विषयाचे प्रोसिडिंग वाचन केल्यानंतर जळगाव शहर शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत जगताप यांची तर महिला आघाडीचे अध्यक्षपदी सारिका शिंपी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेत मागील वर्षाचे जमा खर्च वाचन तसेच संस्थेच्या पुढील उपक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली.

नवनिर्वाचित समाज अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी समाजाचे संघटन व भावी उपक्रमाची माहिती यावेळी दिली तसेच महिला आघाडीचे अध्यक्ष सौ सारिका शिंपी यांनी महिलांसाठी मे जून पासून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना समाजातील मान्यवरांचे व्याख्यान आरोग्य शिबिर व महिलांसाठी स्वयंरोजगार योजना याची माहिती दिली व लवकरच सर्व योजना कार्यान्वित करण्यात येईल अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

याप्रसंगी नामविश्व शिंपी समाज फौंडेशनचे अध्यक्ष बाळकृष्ण देवरे, पिंप्राळा शहर समाजाचे अध्यक्ष यशवंत शिंपी, महाबळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर निकुंभ, जितेंद्र कापडणे, सोमनाथ बाविस्कर, रमेश शिंपी, सुधाकर खैरनार, अँड. शुभम सोनवणे, रमेश बोरसे, दीपक निकुंभ, शरद कापुरे, प्रशांत कापुरे, श्रीराम सोनवणे, सतीश सोनवणे, वनिता शिंपी, मनीषा शिंपी, रंजना शिंपी, सुनंदा बाविस्कर यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content