का. उ. कोल्हे विद्यालयात दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

WhatsApp Image 2019 06 22 at 6.08.15 PM

जळगाव (प्रतिनिधी) येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघातर्फे एसएससी व एचएससी परीक्षेत विद्यालय प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा रोख बक्षिसे व शाल श्रीफळ बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात एसएससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या जयश्री गजानन पाटील, द्वितीय अंकिता किशोर भंगाळे तर मागासवर्गीय आतून गौरव राजेंद्र गिरी बाबा याने प्रथम क्रमांक मिळवला. तर बारावी कला शाखेत प्रथम क्रमांक सपना रायसिंग पाटील, द्वितीय क्रमांक शारदा अनिल पाटील, बारावी विज्ञान प्रथम क्रमांक अंकिता रानडे द्वितीय क्रमांक रेश्मा भोळे तर मागासवर्गीय आतून जयदेव विश्वनाथ ठोसरे याने प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्वांचे रोख बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक शिक्षण मंडळाचे चिटणीस अवधूत पाटील, मुख्याध्यापिका जे. आर. गोसावी, उपचिटणीस एस. डी. खडके, एच. जी. काळे, सौ. बी. एस. राणे, पालक शिक्षक संघाचे कार्यकारी सदस्य तसेच सौ. किरणताई परेश कोल्हे, श्रुती सपकाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. पी. शुक्ल यांनी केले तर आभार जी. बी. पवार यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content