फैजपूर प्रतिनिधी । येथील वीटभट्टी व्यावसायिकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी चार अज्ञात आरोपींना अटक केली आहे. तर एक अद्याप फरार असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, फैजपूर पोलिसात वीट भट्टी व्यावसायिक तरुण आकाश संतोष कापडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला होता. या प्रकरणी पोलिसांनी लखन एकनाथ मंडवाले फैजपूर, गोपाळ मधुकर सुरळकर रा. जळगाव खुर्द राकेश प्रकाश मोरे, आकाश रमेश मस्के रा. कंडारी भुसावळ यांना ताब्यात घेत अटक केली अशी माहिती सिद्धेश्वर आखेगावकर यांनी दिली
हे दि.१७ ऑक्टोबर रोजी आकाश कापडे याला विटा घेण्याच्या बहाण्याने बोलवत अज्ञात दोन आरोपींनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता व रॉडचा वापर करीत त्याला मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. आकाश्याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. दरम्यान गेल्या वीस दिवसांपासून पोलिसांचे पथक या अज्ञात आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी बुलढाणा, मुक्ताईनगर, पहूर, शेंदुर्णी, भुसावळ, फैजपूर येथे चौकशी करून तांत्रिक माहितीच्या आधारे या आरोपींना शनिवारी सकाळी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यामध्ये लखन मंडवाले यांच्याशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून आकाश याच्यावर जळगाव व कंडारी येथील आरोपी मार्फत हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती सपोनि सपोनि सिद्धेश्वर अखेगावकर यांनी दिली.
दरम्यान आरोपी लखन एकनाथ मंडवाले, गोपाळ सुरळकर, राकेश मोरे, आकाश म्हस्के या आरोपींना रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली तर एक आरोपी अद्यापही अज्ञात आहे या आरोपींचा छडा लावणार्या या पथकांमध्ये सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, फौजदार मसलुउद्दीन शेख, पोलीस नाईक किरण चाटे, महेंद्र महाजन, उमेश चौधरी, योगेश महाजन, चेतन महाजन, व पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदीप सावळे यांचा समावेश आहे