भुसावळच्या भाजी बाजारात सोशल डिस्टन्सींगसाठी उपाययोजना

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील घाऊक भाजी बाजार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर स्थलांतरीत करूनही गर्दी कमी होत नसल्याने प्रशासनातर्फे आज बैठक घेऊन उपाययोजना करण्यात आल्या.

सध्या लॉकडाउन सुरु असून कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. परंतु भुसावळ येथे लिलावाच्या ठिकाणी होणारी गर्दी कमी होत नसल्याने महसूल, पोलिस,नगर परिषद आणि भुसावळ फळ भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आज तातडीची बैठक झाली.
या बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, भुसावळ न. प . मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक बाबासाहेब ठोंबे, भुसावळ फळ भाजीपाला असोसिएशन चे अध्यक्ष नरेंद्र चौधरी व सचिव निलेश माळी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी बाजाराचा लिलाव आठवडे बाजाराएवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे स्थलांतरित करण्यात आला. तरी लिलावात होणारी गर्दी कमी झाली नाही आणि सोशल डिस्टिंग सुद्धा पाळले जात नव्हते.
या चर्चात लिलावाच्या ठिकाणी बेरिकेट लावले जाणार असून प्रत्येक आडत दुकानदारामागे २५ व्यापार्‍यांना प्रवेश मिळेल. येथे नगरपालिकेतर्फे विजेची व्यवस्था करण्यात येणार असून येथे येणार्‍या व्यापार्‍यांची गैरसोय होऊ नये अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली असून प्रशासनास सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content