प.वि.पाटील विद्यालयात विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प.वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे पालक-शिक्षक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पाडण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात आलेली पालकांची देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, शारदोत्सवानिमित्त घेण्यात आलेली आजी-आजोबा व विद्यार्थी यांची अंताक्षरी तसेच विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा रंगभरण स्पर्धा तसेच हस्ताक्षर स्पर्धा यांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले.

पालकांच्या गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक – वेदांत नाईक व पालक , द्वितीय – एंजल वानखेडे व पालक , तृतीय- मानव राजहंस व पालक तर उत्तेजनार्थ आर्य राठोड व पालक , आजी-आजोबांच्या स्पर्धेमध्ये प्रथम-ओम सोनार द्वितीय- पलक कासार, तृतीय- शर्वरी खैरनार व त्यांचे आजी आजोबा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाळेच्या उपशिक्षिका स्वाती पाटील व आदर्श सेवा पुरस्कार प्राप्त शाळेचे शिपाई सुधीर वाणी यांना यावेळी शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी पालक-शिक्षक संघाचे सदस्य पल्लवी फेगडे , सुनील येवले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील , सरला पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व शालोपयोगी वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना तायडे यांनी केले तर प्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!