जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर तहसीलदारांनी बोदवडमधील वादग्रस्त बांधकाम रोखले

बोदवड, प्रतिनिधी ।  शहरातील तहसिल कार्यालयासमोरील सुरु असलेले दुमजली अनधिकृत बांधकामाबाबत तत्काळ थांबविण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेकडून एक दिवसीय उपोषण करण्यात येत असता आ. चंद्रकात पाटील यांच्या मध्यस्थीनंतर उपोषण सोडण्यात आले.  

 

शहरातील तहसिल कार्यालयासमोरील सुरु असलेले दुमजली अनधिकृत बांधकामाबाबत राष्ट्रीय छावा संघटनेकडून दि.  १२  जुलै रोजी तक्रार करण्यात आली होती. कारवाईला विलंब होत असल्याने स्वातंत्र्य दिनी एकदिवशीय उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. याबाबत तहसिलदार प्रथमेश घोलप यांचे उपोषणकर्त्यांना काही एक ऊत्तर न आल्याने आज  दि.  १५  ऑगस्ट रोजी रोजी शासकिय ध्वजारोहण संपन्न झाल्यावर उपोषणाला  सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तहसिल कार्यालयात आले असता त्यांनी उपोषणकर्ते राष्ट्रीय छावा संघटनेचे संपर्कप्रमूख अमोल व्यवहारे यांची  भेटघेतली.  यावेळी आमदारांनी स्वातंत्र्य दिनी सुरु असलेल्या उपोषणाबाबत जिल्हाधिकारी माहिती देऊन तहसिलदारांना योग्य ती दखल घेण्याच्या सुचना दिल्या.   यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या  सुचनेनुसार तहसिलदार प्रथमेश घोलप यांनी सुरु असलेल्या दुमजली अनधिकृत बांधकामाच्या दर्शनी भागात सदरील अनधिकृत बांधकाम जैसे थे ठेवण्याचे आदेशाच्या प्रती चिटकवण्यात आल्या. तसेच पुढील कारवाई  शासन धोरणानूसार करुन पुढील माहिती देण्यात येईल असे लेखी स्वरुपात कळविल्यावर उपोषणाची सांगता करण्यात आली.

दरम्यान,  दिनांक १०  रोजी राष्ट्रीय छावा संघटनेचे विधानसभा संपर्कप्रमूख अमोल व्यवहारे उपोषणाबाबत निवेदन देण्यासाठी पोलिस ठाणे बोदवड येथे गेले असता पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांच्या अपमानास्पद वागणूकीचा सामना करावा लागला. तसेच निवेदने ठेऊन घेत सत्य प्रती अद्यापही दिल्या नसल्याने पोलिस अधिक्षक व पोलिस उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीन्वये तोंडी निषेध नोंदविला. कारवाई  न झाल्यास आमरण ऊपोषण करणार असल्याचे अमोल व्यवहारे यांनी सांगितले.

 

Protected Content