जिवान मंडळातर्फ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वपक्षीय अभिवादन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील शहरातील बोरावल गेट परिसरातील नवजीवन मंडळाच्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने सर्वपक्षीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरातील बोरावल गेट परिसरात सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी युवराज सोनवणे यांनी बौद्धवंदना म्हटली.

या कार्यक्रमास एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद जिवराम महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, नाना बोदडे, अनिल जंजाळे, राष्ट्रवादी युवक (शरद पवार गट) चे तालुका अध्यक्ष पवन पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अमोल भिरूड, गुलाम रसुल मेबंर, हाजी गप्फार शाह, शिवसेना उबाठाचे अजहर खाटिक, सरपंच परिषदचे तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे, इंटकचे भगतसिंग पाटील, राष्ट्रवादी पवार गटाचे हितेश गजरे, युवराज सोनवणे,माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी, माजी नगरसेवक समिर शेख मोमीन, डॉ हेमंत येवले, गोलू माळी, विवेक सोनार, नईम शेख, सईद शाह, राहूल गजरे यांच्यासह मोठया संख्येत विविध पक्षांचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी आपली उपस्थिती दर्शवुन महामानवास जयंती निमित्ताने अभिवादन केले.

Protected Content