सिंधी कॉलनीत ध्वजारोहण , कोरोनायोद्ध्यांचा सत्कार

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी , संत कंवरराम नगर भागातील गोदडीवाला परिसरात आज स्थानिक रहिवाशांनी ध्वजारोहण करून सामूहिक राष्ट्रगीत म्हटले .

 

यावेळी उपस्थित प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते शहरातील कोरोनायोद्ध्यांचा सत्कारही करण्यात आला . तत्पूर्वी दीप प्रज्वलन करून भारतमातेचे पूजनही  करण्यात आले  . राष्ट्रीय पोशाख स्पर्धेचे आणि देशभक्तीपर गीतांवरील नृत्याचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते

 

माजी सैनिक  प्रशांत पंडितनाथ जगताप या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . डॉ.  एम . पी.  उदासी, डॉ .  पुनीत रामचंदानी, डॉ.  श्रीमती पूनम मोतिरामनी, स्वछता योद्धा श्रीमती अंजनाबाई वानखेड़े व त्यांचे सहकारी यावेळी उपस्थित होते .

 

Protected Content