पोलीस दूरक्षेत्र लोहारा येथे महात्मा गांधी जयंती साजरी

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील लोहारा पोलीस दूरक्षेत्र येथे सत्य अहिंसा ची शिकवण देणारे महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

 

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलीस दूरक्षेत्र कार्यालयांमध्ये महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट माणुसकी समूहातर्फे देण्यात आली. यावेळी सहाय्यक फौजदार उदय बाळकृष्ण कुलकर्णी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण देशमुख, माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर, राजू नाईक, योगेश जाधव, अक्षय नाईक, विजय जाधव, सुरज पवार, सुखदेव चव्हाण, मुस्ताक पटेल सह माणुसकी समूहाचे सदस्य व लोहारा ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content