यावल शहर व परिसरात अवैध बांधकामांना ऊत : चौकशीची मागणी

illigle construction

यावल, प्रतिनिधी | शहरातील विस्तारीत वसाहतीत शासनाचे सगळे नियम धाब्यावर ठेवुन बेकायदेशीर बांधकामे जोमाने सुरू आहेत. या प्रकाराकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने आपल्या हक्काच्या निवाऱ्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची ही फसगत होत असल्याने न.पा.च्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

 

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की. शहरातील व नगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विस्तारीत क्षेत्रात मागील १० वर्षांपासुन भुखंड विक्री करणाऱ्या टोळक्यांनी धुमाकुळ घातला आहे. यात शेत प्लाट खरेदी विक्री करणारी मंडळी, मध्यस्थी करणारे दलाल, वेंडर आणि नगर पालिकेचा बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजपर्यंत विरतारीत क्षेत्रात शेकडो घरे ही बेकायदेशीररित्या बांधली गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. या व्यवहारात बांधलेली घर व प्लाट खरेदी करणाऱ्यांची शिताफीने आर्थीक फसवणुक करण्यात येत असल्याची स्थानिक नागरिकांची ओरड आहे. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

या नगरपालीका क्षेत्रातील विस्तारीत भागातील भुखंड ही गरजु मध्यवर्गीय नोकरदार वर्ग, छोटे व्यावसायीक, व्यापारी दलाल आणि वेंडर यांच्या लेखणीच्या गोंधळातुन जिल्हाधिकाऱ्यांनी खुल्या भुखंड विक्रीसंदर्भात दिलेले निर्देश व अटीशर्तीची उघड-उघड पायमल्ली करून लाखो रुपयांची प्लाट विक्री आणि घरे बांधुन विक्री करण्याचा धंदा तेजीत आला आहे. या मंडळीकडुन जिल्हाधिकारी यांच्याकडुन ना हरकत प्रमाण मिळवलेल्या भुखंडावरील सार्वजनिक उपक्रम राबवण्यासाठी सोडण्यात आलेले (ओपन स्पेस) भूखंडही विकले असल्याची ओरड होत आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व भुखंड प्रकरणांची व शासकीय नियम धाब्यावर ठेवुन बेकायदेशीरित्या बांधकाम होत असलेल्या घरांची व अशा प्रकारे संगनमताने नागरिकांची फसगत करणाऱ्यांची तत्काळ चौकशी करून अशाप्रकारे भुखंड विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Protected Content