राजीव गांधी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 21 पालकांना धनादेश वाटप

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्हा परिषदेच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत 21 विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 75 हजार रुपये प्रमाणे धनादेशाचे आज वितरण शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील व जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालयास 25 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात आले. त्यापैकी मागील वर्षातील 6 प्रस्ताव मान्य करण्यात आले. त्या विद्यार्थ्यांना अनुदान देणे बाकी होते. त्याप्रमाणे मागील सहा व चालू वर्षातील 15 असे एकूण 21 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 75 हजार रुपये प्रमाणे 15 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश संबंधित विद्यार्थ्यांचे पालक व शाळेचे मुख्याध्यापक यांना आज शिक्षण समितीच्या सभेमध्ये वितरण करण्यात आले.

 

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे, उपशिक्षणाधिकारी विजय पवार, आर.एस. सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण समितीच्या सभेमध्ये झालेल्या बैठकीत कोरोना आजारांचा वाढता प्रभाव पाहता शिक्षक हजेरी प्राथमिक-माध्यमिक पाहता 50 टक्के हजेरी बाबत आदेश देण्यात शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आले. शाळेतील संरक्षण भिंतीचे कामकाजाची आजची परिस्थिती याबाबत आढावा घेण्यात आला व शाळा दुरुस्तीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या बाबतच्या सूचना शिक्षण सभापती रवींद्र सुर्यभान पाटील यांनी दिल्या.  शिक्षण समितीच्या ऑनलाईन झालेल्या सभेत जिल्हा परिषद सदस्य पोपटतात्या भोळे,  नंदा पाटील, प्रमिला पाटील, गजेंद्र सोनवणे, रेखाताई राजपूत, रवींद्रनाना पाटील, हरीश पाटील आदी उपस्थित होते.  शिक्षण समिती सभा संपन्नतेसाठी गुरुनंदन सूर्यवंशी, प्रवीण पाटील व स्विय सहाय्यक कांतीलाल पाटील यांची उपस्थिती होती.

Protected Content