नशिराबाद येथे वीजेच्या धक्क्याने तरूणीचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । नशिराबाद येथील २१ वर्षीय तरुणीचा घरातच विद्युत बोर्डाला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

नशिराबाद (ता.जळगाव) येथील वरची अळी भागातील रहिवासी  योगीता शांताराम महाजन (वय-२१) ही तरुणी घरकाम करत असतांना, विद्युत बोर्डाला तिचा स्पर्श झाला. बोर्डात विद्युतपुरवठा उतरल्याने योगीताला जोरदार झटका लागून ती फेकली गेली. कुटूंबीयांनी तातडीने तिला दवाखान्याने नेले, तेथून जळगावी जिल्‍हा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचारा पुर्वीच पावणे बारा वाजेच्या सुमारास तिचा मृत्यु झाला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबर दिल्याने नशिराबाद पोलिंसात अकस्मीक मृत्युची नेंद करण्यात आली आहे. तपास पोलिस नाईक राजेंद्र भास्कर साळुंखे करत आहेत.

Protected Content