अल्पवयीन मुलगी अत्याचारानंतर गर्भवती; तालुका पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी १५ वर्षीय मुलगी रात्रीच्या वेळी दुकानावर दूध घेण्यासाठी जात असतांना तिचे तोंड दाबून अंधाराच्या ठिकाणी घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारातून अल्पवयीन गर्भवती झाल्यानंतर अत्याचाराचा प्रकार समोर आल्याने नोव्हेंबर २०२० मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील एका परिसरात अल्पवयीन मुलगी ही कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर महिन्यात एका दिवशी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. याचदरम्यान अनोळखी व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला तोंड दाबून  वाघनगर परिसरात एका मोकळ्या मैदानावर नेले व याठिकाणी नराधामाने अल्पवयीन जबरदस्तीने अत्याचार केले. दरम्यान या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्यावर कुणीतरी अनोळखी व्यक्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी १० फेब्रुवारी रोजी पिडीतेच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे हे करीत आहेत.

 

Protected Content