बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बारी पंच मंडळ, बारी युवा प्रकोष्ठ आणि बारी समाज महिला मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पांझरापोळ संस्थान येथे नुकताच करण्यात आला.

१४ जुलै २०१९ रोजी पांझरापोळ संस्थान नेरी नाका जळगाव येथे घेण्यात आला. याप्रसंगी गणेश अरुणराव राऊत (बारी) याने इयत्ता दहावी सेमी मध्ये ९३ टक्के गुण मिळविले याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय व्यक्तीच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई येथील न्यायाधीश नरेश बारी तर प्रमुख पाहुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उ.म.विद्यापीठ जळगावचे कुलगुरू पी.पी.पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार राजु मामा भोळे, नगरसेविका शोभाताई बारी, जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील सिनेट सदस्य नितीन बारी, आरपीएफ जळगाव रेल्वे स्टेशन दिलीप बारी, रफिक जमील शेख, डॉ.निलेश अस्वार, हेमंत सानेसमाज सेवक नागपूर, रमेश हरीशचंद्र बारी, हेड अँन्ड असोसिएट्स प्रोफेसर जामनेर, जेष्ठ पत्रकार शिवलाल बारी, माजी पंच मंडळ, तसेच बारी पंच मंडळाचे अध्यक्ष लतीश बारी, उपाध्यक्ष विजय बारी, सचिव सुनील बारी, सहसचिव मयूर बारी, खजिनदार बालमुकुंद बारी ,नितीन बारी, महेंद्र बारी, विजय बारी, हर्षल बारी. अरुण बारी, पवन बारी,बारी युवा प्रकोष्ठचे जिल्हा अध्यक्ष सुनील बारी, जळगाव शहर अध्यक्ष मनोज बारी, देवेंद्र बारी, प्रवीण बारी, राजू बारी, बुधा बारी, गणेश बारी व इतर सर्व सदस्य व सर्व बारी समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजातील एकूण 350 गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव याठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमात समाज बांधव व विद्यार्थी वर्ग हा बहुसंख्येने उपस्थित होता. यंदाचा गुणगौरव सोहळा हा बारी समाजातील सर्वात मोठा गुणगौरव सोहळा ठरला यात बारी समाजातील महाराष्ट्रातुनच नव्हे तर विविध राज्यांतून विद्यार्थी व पालक वर्ग आवर्जून उपस्थित होता.

Protected Content