भुसावळात बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये चित्रकला व विज्ञान प्रदर्शन

WhatsApp Image 2019 12 22 at 6.25.29 PM

भुसावळ, प्रतिनिधी | येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये पालक दिवसाचे औचित्य साधून चित्रकला प्रदर्शन भरविण्यात आले. यात शाळेच्या विद्यार्थीच विविध कला कौशल्य दिसून आले.

बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये चित्रकला व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात वेगवेगळे वैज्ञानिक मॉडेल, चार्ट तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विषयावरचे चित्र मुली वाचवा मुली शिकवा, पाणी वाचवा व वृक्ष संवर्धन चित्र विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने काढली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे पालकांमधून मलखान सिंग यांनी फित कापून केले. यावेळी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी व सचिव संगीता बियाणी, प्रिंसीपल डी. एम. पाटील उपस्थित होते. सर्व विद्यार्थी व पालकांनी चित्र प्रदर्शनाचा आनंद घेतला. ज्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानीक मॉडेल बनविले होते त्यांनी त्याबद्दल माहिती दिली. संगीता बियाणी यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, विदयार्थ्यानी आपल्यातील चांगले शैक्षणीक गुण दाखऊन विज्ञानात चांगली प्रगती करावी. तुमच्यातून सुद्धा चांगला वैज्ञानीक घडू शकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. आर. पाटील यांनी केले. जे. आर. सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षकांनी कामकाज पहिले.

Protected Content