‘त्या’ महिलेवर अतिप्रसंग करणाऱ्यास अटक

ramanand crime news

जळगाव प्रतिनिधी । बस तिकीटच्या कामासाठी आलेल्या महिलेवर अज्ञात व्यक्तीने ओळख दाखून शुक्रवारी रात्री 55 वर्षीय जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. यातील संशयित आरोपीस रामानंद नगर आणि स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील 57 वर्षीय महिला बस तिकीटच्या स्मार्ट कार्डसाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी दुपारी 3 वाजता आल्या होत्या. त्यांचे दाखल्याचे काम झाले नसल्यामुळे ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत थांबून होत्या. त्यावेळी एक सडपातळ उंचीचा, हिंदी भाषेत बोलणारा अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन ओळख निर्माण केली व बस कार्डचे काम करणारा माझ्या ओळखीचा आहे असे सांगितले. त्यानंतर सदर महिलेला सिविल हॉस्पिटलच्या बाहेर असलेला पावभाजी दुकानावर घेऊन गेला तेथून महिलेच्या महिलेला रिक्षात बसून पिंप्राळा हुडको रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या फ्लॅटचे पडीत जागेत घेऊन गेला. दरम्यान त्याने एका ठिकाणी रिक्षा थांबवून दारूची बाटली विकत घेतली होती. रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान दारू पिऊन त्याने मोकळया पडीक जागेत घेऊन जात तिला शरीरसुखाची मागणी केली, मात्र याला तिने प्रतिकार केला असता अनोळखी व्यक्तीने तिला बुक्क्यांनी तोंडावर डोळ्यांवर मारहाण केली यात त्या गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यानंतर सदरील पीडित महिलेने आरडाओरड केल्याने त्याने तेथून पळ काढला होता.

याप्रकरणातील संशयित आरोपी फारूख मज्जीद भिस्ती रा. पिंप्राळा याला स्थानी गुन्हे शाखेने शहरातील बेंडाळे चौकातून ताब्यात घेतले. या कारवाईसाठी एलसीबीच्या पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, राहुल पाटील, पोउनि रोहीदास ठोंबरे, पोका अतुल पवार, पोका राहुल पाटील यांनी कारवाई केली.

Protected Content