बसच्या धडकेत दुकावरील महिला गंभीर जखमी

पारोळा प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्ग 6 वर सबगव्हान गावाजवळ बसने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने वृध्द महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी बसचालकाविरोधात पारोळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रमेश सुनील पाटील रा. मोंढाळे ता. पारोळा हे आपले दुचाकी क्रमांक (एमएच १९ डी बी ८४६९) हिच्यावर चुलत आजी अनिता सुरेश पाटील (वय ५०) रा.शिरसोली ता.जि.जळगाव यांना बसवून गावाकडे येत होते. त्याचवेळी भरधाव वेगाने मागून बस क्रमांक (एमएच २० बीएल १९५९) वरील चालकाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. धडकेत अनिता पाटील ह्या खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाले. घटनास्थळावरून बसचालक बस न थांबता तशीच पुढे पळवून नेली. दरम्यान रस्त्यावरील इतर नागरिकांच्या सहकार्याने आजीला धुळे येथे औषध उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content