खुशखबर….अमेरिकेत कोरोनावरील लसीची चाचणी !

नवी दिल्ली । कोरोनामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असतांना आता अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी या विषाणूचा प्रतिकार करणार्‍या लसीची चाचणी घेतल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला महारोगराई घोषित केलं आहे. या भयंकर रोगानं जगभरात आतापर्यंत ७००० हून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, याचा प्रतिकार करण्यासाठी तयारी करण्यात येत असून अमेरिकन शास्त्रज्ञांनी याची लस तयार केली आहे. पहिल्या व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा या प्रयोगाचं कौतुक केलं असून, लवकरच ही लस जगभरात विकसित केली जाईल, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. अमेरिकेतील ४५ कोरोनाबाधित रुग्णांना या प्रयोगासाठी निवडण्यात आलं असून, त्यांना टप्प्याटप्प्यानं ही लस देण्यात येणार आहे. या लसीचा कोणताही दुष्परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी डॉक्टर घेत आहेत. सोमवारी एका व्यक्तीला ही लस देण्यात आली. त्यानंतर आता आणखी तीन लोकांना ही लस देण्यात येणार आहे. या ४५ लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. या लसीचा सर्वांवर पडणार्‍या प्रभावाचं निरीक्षण केलं जात आहे. ही लस रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी असून यापासून रूग्णाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Protected Content