एरंडोल नगरपालिकेचे दुर्लक्ष : लोकसहभागातून नदीची स्वच्छता

एरंडोल प्रतिनिधी । शहरातील अंजनी नदी स्वच्छ करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी नगर पालिकेकडे वारंवार केली आहे. मात्र, अखेर सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी नदीची स्वच्छता केली आहे.

एरंडोल नगर पालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहरातील पर्यावरण प्रेमी मंडळींची समस्या लक्षात घेता शहरातील सर्व नागरीक, सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, शिक्षक वृंद, सामाजिक मंडळ, तालीम मंडळे, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ यांना आवाहन केले आहे की, एरंडोल नगर पालिकेतर्फे लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता तसेच श्रमदानातून स्वच्छता व नदी काठावर वृक्ष लागवड मोहीम दि.२३ जाने (पराक्रम दिन) ते २६ जाने (प्रजासत्ताक दिन) २०२२ सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आली आहे.

तरी आपल्या शहराच्या शाश्वत विकासासाठी आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात कोविड 19 अनुषंगिक नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा. श्रमदानासाठी शक्य असल्यास आवश्यक असलेले साहित्य सोबत घेऊन यावे. एरंडोल शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Protected Content