शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या शोर्य गाथा ऐकविण्यात आल्या.

शेंदुर्णी येथील गांधी चौकात सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासिनाधिष पुतळ्याचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरूड यांनी केले. या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, माजी सरपंच सागरमल जैन, काशिनाथ बारी, युवा नेते स्नेहदिप गरूड, विलास अहिरे, गजानन धनगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्रीराम काटे, मन्सूर पिंजारी, शंतनू गरूड, दिग्विजय सूर्यवंशी व गावातील नागरिक तसेच गरूड विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय उदार व सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थीत होते.

यावेळी बाल शिवाजी महाराजांच्या वेश भूषेतील बालकांनी महाराजांच्या आवेशपूर्ण भाषणे केली तर गरूड विद्यालयातील विद्यार्थीनीनी पोवाडा सादर केला. शेंदुर्णी नगरंचायतीच्या प्रांगणात नगर पंचायतचे वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, शिवाजी महाराज पुतळा समितीचे उपाध्यक्ष संजय गरूड, पंडितराव जोहरे, संचालक-अमृत खलसे, गोविंद अग्रवाल, सुनिल अग्रवाल, डॉ. विजयानंद कुळकर्णी,  ॲड. धर्मराज सूर्यवंशी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संजय गरूड, गोविंद अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सुनील अग्रवाल, पंडितराव जोहरे यांनी शिवजयंती निमित्त आपले विचार प्रकट केले. अमृत खलसे यांनी प्रास्ताविकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी आपले मनोगत व्यक्त केले. हभप सचिन महाराज आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर युवकांनी पोवाडे गायले.

 

Protected Content