‘प्रोजेक्ट ओ-2’ अंतर्गत 100 वृक्षांचे रोपण

vruksharopan

खामगाव प्रतिनिधी । फक्कड देवी गौरक्षण परिसरात दि. 21 जुलै रोजी डॉ. थानवी यांच्या पुढाकारातून तसेच स्थानिक नागरिक व मुक्तांगण फाउंडेशनतर्फे 100 रोपणाचे वृक्षरोपण ट्री-गार्डसह करण्यात आले आहे.

माणसाला निसर्गाशिवाय पर्याय नाही, त्याने कितीही प्रगती केली तरी अन्न, हवा, पाणी ही मानवाची प्राथमिक गरज आहे. ही गरज निसर्ग विनामूल्य पुरवत असतो. परंतू मनुष्य हा अत्यंत लोभीप्राणी असल्यामूळे गरजा अवास्तव करुन ठेवल्या आहेत. यातूनच निसर्गाला हानी पोहचवत आहे. परंतू निसर्गाला परत देण्याचे काम फार तुरळक लोक करतांना दिसत असून हे प्रमाण वाढावा यासाठी डॉ. थानवी यांच्या “प्रोजेक्ट ओ 2” अंतर्गत संकल्पना मांडली आहे. माणसाला सर्वात जास्त ऑक्सिजनची गरज असते. ती भागविण्याचे काम फक्त झाडेचे करत असतात. त्यासाठी झाडे जगविणे हे काळाची गरज आहे. मुक्तांगण फाऊंडेशन नेहमीच पर्यावरणाच्या कार्यात अग्रेसर असल्यामुळे ह्या प्रकल्पा अंतर्गत 100 वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, वृक्षारोपण करुन चालणार नाही तर त्याचे संवर्धन सुद्धा व्हायला पाहिजे. याविषयी स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून 100 वृक्ष लावण्यात आले. या झाडाचे संगोपन व्हावे यासाठी फायबरचे ट्री-गार्ड बसवण्यात आहे. या उपक्रमा अंतर्गत कडुलिंब, गुलमोहर, बहावा, चिंच, कारनेट, कडू बदाम, बेल, पिंपळ व जामुन आदी झाड़ाची लागवड करण्यात आली. यावेळी उपक्रमात महिला मंडळी, लहान मुलं-मुली, स्थानिक तरुण आदींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. थानवी, स्थानिक नागरिक व मुक्तांगण फाउंडेशन टिमने विशेष प्रयत्न केले.

Protected Content