‘चांद्रयान-2’ ची शेवटचे १५ मिनिटे अतिशय आव्हानात्मक : के. शिवन

0chandra 2

नवी दिल्ली प्रतिनिधी । ‘चांद्रयान- २’ या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण काही तासांवर येऊन ठेपले आहे. चंद्रावर उतरण्यापूर्वीचे १५ मिनिटे यानासाठी सर्वाधिक ताणावाची असणार असून ‘या कालावधीत असे काही करू जे यापूर्वी कधीही केलेले नाही’. याच कारणामुळे हा कालावधी अतिशय तणावाचा असणार असल्याचे इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी म्हटले आहे.

स्वदेशी निर्मिती असलेल्या ‘चांद्रयान-२’ मध्ये एकूण १३ पेलोड आहेत. आठ ऑर्बिटरमध्ये ३ पेलोड लँडर विक्रम आणि २ पेलोड रोव्हर प्रज्ञानमध्ये आहेत. यात ५ भारताचे, ३ युरोपचे, २ अमेरिकेचे आणि एक बुल्गारियाचा पेलोड आहे. लाँचिंगनंतर सुमारे १६ मिनिटांनी जीएसएलव्ही एमके- ३ चांद्रयान- २ ला पृथ्वीच्या कक्षेत सोडेल. लँडर ‘विक्रम’चे नाव भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम ए. साराभाई यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. तर २७ किलो वजनाचा रोव्हर ‘प्रज्ञान’ याचा अर्थ आहे बुद्धिमत्ता. ‘चांद्रयान-२’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार असून, चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर चांद्रयान-२ ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. केवळ इस्रोसाठीच नाही, तर संपूर्ण भारतीयांसाठीच ही १५ मिनिटे तणावाची असतील, असे शिवन यांनी सांगितले. भारत सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्यास असे करणारा तो जगातील चौथा देश ठरणार आहे. आता पर्यंत अमेरिका, रशिया आणि चीन यात यशस्वी झाला आहे.

Protected Content