महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता ?

fadnavis and thakare 1

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेकडून चर्चेची दारं बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉचच्या’ भूमिकेत आहे. दुसरीकडे शिवसेनाही वेट अँड वॉचच्या भूमिका घेतलीय. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरु आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. तर भाजपाही सरकार स्थापनेसाठी दावा करणार नसल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, या घडामोडींच्या दिशेने पुढील 48 तास निर्णायक असणार आहेत.

8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असे कळते. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास भाजप श्रेष्ठी निश्चिंत असल्याची चर्चा आहे. 2014 साली भाजपच्या बाजूने आकडे होते. मात्र यंदा आमदारांचे आकडे कमी पडत असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे फोडाफोडीचे किंवा बेरजेचे राजकारण करुन सत्तास्थापनेचा कुठलाही प्रयत्न भाजपकडून होणार नाही, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरु आहे.

Protected Content