किरण गोसावी गजाआड : पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे प्रतिनिधी | सध्या गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणातील पंच तसेच अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी किरण उर्फ के. पी. गोसावी याला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटकेत असून सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. गुन्हे शाखेकडून किरण गोसावीविरोधात कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे. किरण गोसावीवर नोकरींच अमिष दाखवत तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्याच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरण गोसीवाचा शोध घेताना पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊतही पोहोचलं होतं. दरम्यान पुणे पोलिसांना अखेर यश मिळालं असून किरण गोसावीला अटक केली आहे.

किरण गोसावीला फसवणुकीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र कुठून ताब्यात घेतले आहे हे आम्ही सांगू शकत नाही काही वेळात त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे, असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!