जिल्ह्यात ७०८ कोरोना पॉझिटीव्ह; ४२० झाले बरे : रूग्णसंख्येने ओलांडला २५ हजारांचा टप्पा !

जळगाव प्रतिनिधी । आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण ७०८ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून आजच ४२० रूग्ण बरे झाले आहेत. तर आजच्या रूग्णांना धरून जिल्हाभरातील आजवरच्या पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या २५ हजारांच्या पार गेली आहे.

आज सायंकाळी आलेल्य रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ७०८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरात तब्बल १४९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. त्या खालोखाल चोपडा-१०० आणि अमळनेर- ९२ याप्रमाणे आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुकानिहाय आजच्या आकडेवारीचा विचार केला असता रूग्णसंख्या पुढील प्रमाणे आहे. जळगाव शहर-१४९; जळगाव तालुका-११; भुसावळ-४३; अमळनेर-९२; चोपडा-१००; पाचोरा-३०; भडगाव-१३; धरणगाव-३८; यावल-१३; एरंडोल-०; जामनेर- ४९, रावेर-३८; पारोळा-७८; चाळीसगाव-२६; मुक्ताईनगर-१८; बोदवड-५ आणि इतर जिल्ह्यातील ५ रूग्णांचा समावेश आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-५५९७; जळगाव तालुका-१३५०; भुसावळ-१४४५; अमळनेर-१९६९; चोपडा-२०५२; पाचोरा-१०२५; भडगाव-११४२; धरणगाव-१२१४; यावल-८२८; एरंडोल-१५०१; जामनेर-१७२९, रावेर-१२६५; पारोळा-११८०; चाळीसगाव-१५०८; मुक्ताईनगर-७९९; बोदवड-३५६ आणि इतर जिल्ह्यातील १३३ असे एकुण आजपर्यंत २५ हजार ९३ कोरोना रूग्ण आढळून आलेत.

जिल्ह्यात आजपर्यंत २५ हजार ९३ कोरोना रूग्ण आढळून आले असून यापैकी १७ हजार ५२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ४२० रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे . आज १३ रूग्णाचा मृत्यू झाला तर मृतांचा आकडा एकुण ७७८ वर पोहचली आहे. तर उर्वरित ६ हजार ७९० रूग्ण उपचार घेत आहे.

Protected Content