राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी; यावल येथे तहसीलदारांना दिले निवेदन

यावल प्रतिनिधी । इंग्लंडचा गोलंदाज जेम्स एन्डरसन यांने केलेल्या विविध देशाविरुद्ध खेळतांनाची कारकीर्दची कामगारी दर्शवितांना देशाचा तिरंगा या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्यात आला. तिरंगाचा अवमान करणाऱ्यांना जाहीररित्या माफी मागावी याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

निवेदनात सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अश्पाक शाह यांनी म्हटले आहे की , २३ ऑगस्ट२०२० रोजी सोशल नेटवर्कच्या माध्यमातुन इन्स्टाग्राम वरती आपल्या क्रिकेट कारकीर्दत पाकीस्तानी संघाविरूद्ध गोलंदाजी करीत असतांना ६०० बळीच्या संख्याचा टप्पा गाठल्याने त्याचा इंगलेंड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आले असता, वेगवान गोलंदाजाची जेम्स एन्डरसन याची कशी कामगीरी होती. ही दर्शविण्यासाठी इंग्लन्ड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्या त्या देशाचे नांव न घेता प्रत्येक देशाचे ध्वजाचे छायाचित्र दर्शवुन त्या राष्ट्रीय ध्वजावर त्यास उभे असे दाखविले. हा आपल्या देशाच्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करण्यात आला आहे.

आपल्या देशाच्या बीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली आणी बीसीसीआयचे चिफ सेक्रेटरी जय शाह यांनी तात्काळ या विषयी लक्ष घालावे व जोपर्यंत इंग्लेन्ड क्रिकेट असोसिएशन आणी त्यांच्या देशाचा वेगवान गोलंदाज जेम्स एन्डरसन यांनी आपल्या देशाशी माफी मागीतल्या शिवाय त्यांना पुढील महीन्यात होवु घातलेल्या इंडीयन प्रिमियर लिग आयपीएल या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी देवु नये अशा मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांना देण्यात आले.

याप्रसंगी निवेदनकर्ते मोहम्मद अश्पाकशाह गफ्फारशाह, यावलचे माजी उपनगराध्यक्ष हाजी ईकबाल खान नसीर खान, रिपाई आठवले गटाचे विष्णु टीकाराम पारधे, शेख सलीम , जफर शाह यावेळी उपस्थित होते .

Protected Content