…तर युपी सरकारचा राजीनामा मागणार का ? – देवेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी । युपी सरकारने विद्यार्थ्यांवर लाठीमार केला असून आता अभाविप त्यांचा राजीनामा मागणार का ? असा सवाल एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. या संदर्भात जारी केलेल्या वक्तव्यात त्यांनी धुळे येथील घटनेबाबत टीका केली आहे.

धुळे येथे अभाविपच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी केलेल्या अत्याचाराबाबत आज एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी भूमिका जाहीर केली आहे. या संदर्भात जारी केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काल धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांनी विनापरवानगी असंविधानिक रीत्या थेट पालकमंत्री यांच्या गाडीसमोर उडी मारून आंदोलन करण्याचा स्टंट केला.

परंतु त्यांना पोलिस प्रशासनाने समजावून सांगून सुद्धा ते पालकमंत्री यांच्या गाडी समोरून हटत नसताना नाईलाजास्तव पोलिस प्रशासनाला त्यांच्यावरती बळाचा वापर करावा लागला व कुठली दुर्घटना होऊ नये याकरता त्यांना गाडीच्या समोरून बाजूला करण्यात आले होते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कोरोना काळामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांकडून कुठलीही परीक्षा शुल्क आकारले नसतानादेखील चुकीच्या मागणीचे चमकू आंदोलन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी काल केले व आज दिवसभरात पासून सोशल मीडिया व महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपाच्या व ए बि व्हि पी च्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केली.

जळगाव येथे सुद्धा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महा विकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. परंतु भाजपाच्या नेत्यांना जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने प्रतिआव्हान देण्यात येत आहे की, आज उत्तर प्रदेश राज्यांमध्ये केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकण्यासाठी जेईई व नीट यासारख्या प्रवेश परीक्षा संदर्भात परीक्षा घेण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ उत्तर प्रदेश राज्यांमधील समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले असता तेथील योगी सरकारने व भाजप सरकारने या आंदोलकांवर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज केला व त्यांना मरेपर्यंत मारहाण करण्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडिया वरती दिसून येत आहेत.
मग आता या भाजपच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने महा विकास आघाडी सरकारचा निषेध केला व राजीनामा मागितला , त्याचप्रकारे हे भाजपचे नेते योगी सरकारचा देखील राजीनामा व निषेध व्यक्त करतील का..? असा सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी भाजपाच्या नेत्यांना केला.

तुमच्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला तो अत्याचार आणि योगी सरकारने समाजवादी पार्टीच्या आंदोलकांवर ती केलेला लाठीचार्ज हे पुण्य का मग..? याचे उत्तर भाजपाच्या नेत्यांनी द्यावे असे आव्हान या पत्रकात देण्यात आले आहे.

Protected Content