भाजपा युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सागर कोळी यांची फेरनिवड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवा सामाजिक कार्यकर्ते व पक्षाची यशस्वी धुरा सांभाळणारे सागर नामदेव कोळी यांची पुनश्च भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

यावलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पक्षाच्या बैठकीत भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी सर्वानुमते सागर नामदेव कोळी यांची पक्षाच्या प्रचार प्रसार व संघटन बांधणीसाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत पक्षाच्या वतीने त्यांची पुनश्च भाजपा युवा मोर्चाच्या यावल तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.

सागर कोळी यांच्या निवडीचे मंत्री ना.गिरीष महाजन, खा.रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील , जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविन्द्र पाटील, कृउबाचे माजी सभापती नारायण चौधरी, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, संचालक उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, युवा मोर्चाचे व्यंकटेश बारी, राहुल बारी, रितेष बारी, भुषण फेगडे, दहिगावचे उपसरपंच देवीदास पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक अतुल भालेराव यांनी स्वागत केले आहे.

Protected Content