अतिक्रमण विभागाकडून खोटी कारवाई ; स्थायी सभेत नितीन बरडे यांचा आरोप (व्हिडीओ)

jalgaon nagar palika news

जळगाव, प्रतिनिधी | सफाई माक्तेदाराच्या कार्यशैलीबाबत आज देखील स्थायी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन सफाई माक्तेदाराला सरंक्षण देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसेच अतिक्रमण विभाग खोट्या कारवाया करत असून ते सदस्यांची बदनामी करत आहे. साभृहात सदस्य विषय मांडत असतात परंतु अद्यापही त्याची माहिती दिली जात नसल्याने सभापतींनी देखील अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला.

मनपाची आज स्थायी समितीची सभा सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी उपायुक्त मिनीनाथ दंडवते, मुख्यलेखाधिकारी संतोष वाहुळे, लेखाधिकारी कपील पवार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. शिवसेनेच्या सदस्यांनी सफाई मक्तेदाराच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत मक्तेदारास पुन्हा किती संधी द्याल असा प्रश्न उपस्थित केला. माक्तेदाराबाद्द्ल पहिल्या दिवसापासून असलेली तक्रार अद्यापही दूर झालेली नसल्याने मक्तेदाराला पाठीशी घालणार का ? असा थेठ सवाल शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी केला. याला उत्तर देतांना यावर उपायुक्त दंडवतेंनी मक्तेदाराच्या बाबत आयुक्त मक्तेदाराची सुनावणी घेवून येणाऱ्या महासभेत प्रशासनाची भूमीका मांडणार असल्याचे सांगितले. अतिक्रमण विभागाकडून शहरात सर्रास हप्ते वसुली सुरू असून खोट्या कारवाई करून गरिब हॉकर्स तसेच बंद अवस्थेत एका बाजूला पडलेल्या सामान जप्त करून कारवाई दाखवित आहे. दुसरीकडे रस्त्यावर अनधिकृतपणे स्टॉल लावण्याची परवागी देत आहे. यापूढे हप्ते घेतांना कोणी अढळल्यास थेट आयुक्तांना तेथे आणून उभे करेल असे खडेबोल अतिक्रमण विभागाचे अधिक्षकांना सुनावत चांगलेच धारेवर धरले.  न्यायालयात महापालिकेची अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्यांतून मनपाच्या उत्पन्नात वाढ होऊ शाकेत. मात्र, याकडे महापालिकेतील अधिकारी कानाडोळा करत आहेत. महापालिकेचे पावणे दोन कोटी रुपये उच्च न्यायालाकडे एक प्रकरणात पडून असतांना ते परत मिळविण्यासाठी कोणीही कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करीत नसल्याचे नितीन लढ्ढा लढा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सदस्य विविध प्रश्‍न मांडून देखील अधिकारी सोडवित नाही, त्यामुळे सभापतींनी रणरागणीचे रुप घेण्याची वेळ आली असे मत शिवसेनेचे सदस्य लढ्ढांनी केले. दरम्यान, सभागृहात सक्षम अधिकारी उपस्थित राहत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी मागील दोन तीन सभेपासून आयुक्त नाही, उपायुक्त नसतात असे समस्या मांडली. यावेळी सभापतींनी आयुक्त, दोन्ही उपायुक्तांनी पुढील सभेपासून उपस्थित राहावे अशी स्पष्ट सुचना यावेळी प्रशासनाला दिली. सभेच्या विषयपत्रीकेवरील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांचा वेतनवाढी बाबतचा प्रश्‍नावर लढ्ढांनी प्रश्‍न उपस्थित केला. या वैद्यकीय अधिकाऱ्यावर महिला कर्मचाशी गैरवर्तणूक केलाचा आरोपावरून शिक्षा दिली गेली आहे. तरी यावर प्रशासनाने आता जी भूमीका मांडली त्यामुळे संशय असून यात गैरव्यवहार अथवा जवळीक असल्याने त्यांना पाठिशी घातले जात असल्याचे आरोप केला. त्यानतंर सभापतींनी हा विषय तहकूब करून या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती घेण्याचे आश्‍वासन दिले.

Protected Content