कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमीतच फेकले जाताहेत पीपीई किट

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला खबरदारी म्हणून पीपीई दिले जाते. मात्र मयताला जाळल्यानंतर घातलेले पीपीई किट स्मशानभूमीत टाकून दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्काराच्यावेळी जाणाऱ्या कर्मचारी याला पीपीई किट देण्यात येत असते , जेणेकरून त्याला कोरोना होऊ नये याची खबरदारी प्रशासनातर्फे घेतली जाते. कोरोनाबाधीत मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्यानंतर संबंधित व्यक्तींनी घातलेले ती कीट जाळून न टाकता, जिल्हा रूग्णालायातील अधिकारी व कर्मचारी अंगावरील पीपीई किटची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट न लावता बेफिकीरपणे इतरत्र फेकून देत असल्याचा प्रकार रविवारी नेरी नाका परिसरातील स्मशानभूमीत घडला. या गंभीर प्रकाराबाबत जळगावातील नेरी नाका परिसरात असलेल्या स्मशानभूमीतील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याची ओरड नागरीकांमध्ये होत आहे.

Protected Content