पुण्यात ॲन्टीबॉडी तपासण्याचे ‘कोविड कवच एलिसा टेस्ट’किट विकसीत

पुणे वृत्तसंस्था । येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने ॲन्टीबॉडीज तपासण्याचे किट विकसित करण्यात आले असून कोरोना विषाणूच्या लढ्यात भारताने महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. त्यामुळे प्रथमच भारतात स्वदेशी ॲन्टीबॉडी टेस्ट किटचे संशोधन करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली. देशात विकसित केलेल्या या टेस्टिंग किटला ‘कोविड कवच एलिसा टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोनाच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवण्यात किट महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. मुंबईतील दोन वेगवेगळ्या ठिकाणीच याची टेस्टिंग करतांना हे किट योग्य असल्याचे निदर्शनास आले. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने मोठे संशोधन करत ॲन्टीबॉडी तपासण्याचे किट यशस्वीरित्या विकसित केले आहे. हे किट कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे का? हे तपासण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबतची माहिती दिली.

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अडीच तासांमध्ये 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे. येत्या काळात जास्त लोकसंख्या असलेल्या परिसरात कोरोना विषाणू संसर्गावर लक्ष ठेवण्यात तसेच कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची ओळख पटवण्यात ही किट महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. या किटद्वारे एखाद्याच्या रक्तात किती रोगप्रतिकारक शक्ती आहे याची माहिती मिळणार आहे.

Protected Content