कर्नाटकातील भाषणात राहूल गांधींचा हल्लाबोल

बंगळुरू-वृत्तसंस्था | कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील पहिल्याच भाषणात राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

आज   कर्नाटकच्या कोलार भागात राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा अदाणी मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, अदानीची शेल कंपनी आहे. या कंपनीतील २० हजार कोटी कोणाचे आहेत? भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की सत्ताधारी पक्षानेच संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. सहसा विरोधक संसदेतील कामकाज बंद पाडतात. परंतु, पहिल्यांदाच मंत्र्यांनीच कामकाज थांबवले.   मी लोकसभेच्या अध्यक्षांना दोनवेळा पत्र लिहिले, की माझ्यावर झालेल्या आरोपांवर मला बोलायचं आहे. पण मला बोलायची संधी दिली गेली नाही. ते माझ्यावर हसले आणि मला म्हणाले मी काहीच करू शकत नाही.

 

गांधी पुढे म्हणाले की, भाजपने कर्नाटकात ४० टक्के कमिशन खाल्ले. काम करण्यासाठी भाजपा सरकारने कर्नाटकातील लोकांच्या पैशांची चोरी केली. त्यांनी जे काही केलं ते ४० टक्के कमिशनसाठी केलं. हे मी बोलत नसून कंत्राटदारांच्या संघटनांनी पंतप्रधांनाना पत्र लिहून कळवलं आहे. पंतप्रधानांनी या पत्राचंही उत्तर दिलेलं नाही. पत्राचं उत्तर न देण्याचा अर्थ असा की पंतप्रधानांनासुद्धा कर्नाटकातील ४० टक्के कमिशन मान्य आहे.

Protected Content