कोरोना : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १ हजारावर

मुंबई वृत्तसंस्था । राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनीची लागण वाढत असून गेल्या २४ तासाता तब्बल २२१ पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले आहे. राज्यातील कोरोनाबाधित पोलीसांचा आकडा एक हजाराच्या वर पोहचलाय.

गेल्या काही दिवसात पोलिसांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून आज (११ मे) सर्वाधिक २२१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ७८६ वरुन १ हजार ००७ वर पोहोचला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात गेल्या सहा दिवसात जवळपास ५५० पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर दुर्देवाने आतापर्यंत ७ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईतील ३, पुणे १, सोलापूर १ अशा ५ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. सुदैवाने यातील १३ अधिकारी आणि ६३ पोलीस कर्मचारी असे एकूण ७६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान जर पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Protected Content