खामगाव येथे प्रेस क्‍लबची सर्व साधारण सभा उत्साहात

khamgaon news

खामगाव प्रतिनिधी । प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही खामगाव प्रेस क्‍लबतर्फे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या वर्षीपासून प्रथमच शहरातील जडणघडणीत महत्वाचा वाटा उचलणार्‍या संस्थांना खामगाव गौरव नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षीचा हा प्रथम पुरस्कार आहे. त्यानिमित्त प्रेस क्‍लबची सर्व साधारण सभा आज 22 डिसेंबर 2019 वार रविवार रोजी पत्रकार भवन खामगाव येथे सकाळी 10 वाजता उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मो. फारुख सर हे होते, तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ पत्रकार, प्रेस क्‍लब कायम निमंत्रित सदस्य श्री गजानन कुळकर्णी, अध्यक्ष किशोरआप्पा भोसले, सचिव अनिल खोडके हे होते. सर्व प्रथम खामगाव प्रेस क्‍लब खामगाव च्या मागील सर्व साधारण सभा व कार्यकारिणी सभांचे वृत्तांत सभेसमोर मांडून कायम करण्यात आले. तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा 6 जानेवारी पत्रकार दिनाचा कार्यक्रम आयोजना संदर्भात विविध विषयांवर चर्चा करुन हा पत्रकार दिन मोठया थाटामाटात साजरा करण्यात यावा असे ठरविण्यात आले. दरवर्षी या पत्रकार दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात खामगाव प्रेस क्‍लबच्या वतीने शहरात सतत समाजसेवा करुन इतर समाजसेवा करणार्‍या व्यक्‍तींना आदर्श ठरणार्‍या व्यक्‍तीला खामगावरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते तर पत्रकारितेतून समाजाच्या व्यथा शासन दरबारी मांडून समाजाला न्याय मिळवून देणार्‍या पत्रकाराला स्व. बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ह्या सभेत पुरस्कार प्रदान करण्यासंदर्भात योग्य व्यक्‍तींची व संस्थेची नावे उपस्थित पत्रकार बांधवांकडून सुचविल्यानुसार घेण्यात आली आहे तर नावे निश्‍चित करण्याकरीता कार्यकारिणीस समिती तयार करुन निर्णय घेण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. बैठकीचे संचालन पत्रकार योगेश हजारे यांनी केले तर आभार अनुप गवळी यांनी मानले. या बैठकीला खामगाव प्रेस क्‍लबचे सर्व सन्माननिय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Protected Content