‘त्या’ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा -विविध सामाजिक संघटनांची मागणी

 

जळगाव प्रतिनीधी । येथील नवजीवन सुपर शॉप मध्ये शहरातील एका वृद्ध महिलेचा व्हिडिओ काढून त्याला व्हायरल केल्या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य  पोलिस कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन छावा मराठा युवा महासंघ व  विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात देण्यात आले. 

याबाबत सविस्तर असे की, शहरातील महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉपमध्ये एक वृद्ध महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आली असता सदरील महिलेने तेथील काही सामान चोरुन नेण्याचा प्रयत्न केला, परंतू सदरील घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने सदर महिलेला ऑफीसमध्ये चौकशीसाठी बोलविले असता, तिच्या जवळ चोरी केलेले सामान आढळून आले.  प्रसंगी तिची चौकशी सुरू असताना तेथील काही कर्मचाऱ्यांनी सदरील घटनेचा व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद करुन त्या व्हिडिओत सदरील महिलेचे तोंडावरील मास्क काढत, एखाद्या महिलेला लाजवेल असा घृणास्पद व्हिडिओ काढून शहरातील विविध सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी नवजीवन सुपर शॉपमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांवर भादंवी कलम ४९९, ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल करावा अश्या आशयाचे निवेदन छावा मराठा युवा महासंघाने व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रामानंद नगर पोलिस ठाण्यात दिले. प्रसंगी,  साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सारिता कोल्हे , छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे ,  सामाजिक  कार्यकर्ते दिपक सपकाळे,  रेखा पाटील, अॅड. अभिजित रंधे, प्रशांत फाळके उपस्थित होते.

Protected Content