जिल्ह्यात नवीन ५७४ कोरोना बाधित आढळले; जळगावात रूग्णांचा आकडा चार हजारावर

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल ५७४ रूग्ण आढळून आले आहेत. आजच्या अहवालात जळगाव शहराने ४ हजाराचा टप्पा पार केला आहे. जळगावसह अमळनेर आणि चोपडा तालुक्यात पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्ह्यामध्ये ५७४ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १६८ रूग्ण हे जळगाव शहरातील असून अमळनेर-८९, चोपडा-६४ असे आहे. त्या खालोखाल जळगाव ग्रामीण- २४, भुसावळ-२२, पाचोरा-२५, भडगाव-०९, धरणगाव-३२, यावल-२३, एरंडोल-४, जामनेर -३१, रावेर -१४, पारोळा-३४, चाळीसगाव-२१, मुक्ताईनगर-०३, बोदवड-१ आणि इतर जिल्हे ५ असे एकुण ५७४ रूग्ण आज आढळून आले आहे.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर- ४१००, जळगाव ग्रामीण-८३५, भुसावळ-११०७, अमळनेर-१२४५, चोपडा-१२३०, पाचोरा-६५५, भडगाव-७०८, धरणगाव-७९९, यावल-५८८, एरंडोल-८६०, जामनेर-११९७, रावेर-८३१, पारोळा-६८०, चाळीसगाव-८४९, मुक्ताईनगर-५०१, बोदवड-२७९, इतर जिल्हे-८१ असे एकुण १६ हजार ५३६ रूग्णांची संख्या झाली आहे.

आजच्या आकडेवारीने जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ही १६ हजार ५३६ इतकी झाली आहे. यातील ११ हजार ३२५ इतके रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात आजच ३४४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजवर ६३८ रूग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५७३ रूग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती या प्रेस नोटमध्ये दिलेली आहे.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update

Protected Content