शिरसोली येथील महिलेला चौघांकडून मारहाण; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वाद झाल्याने माहेरी गेलेल्या विवाहितेच्या आईला मुलीच्या सासरच्या मंडळीकडून मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विवाहितेच्या पतीसह तीन जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, विवाहिता छाया श्याम कलाल व श्याम महादेव कलाल रा. शिरपूर जि. धुळे यांच्या कौटुंबि वाद असल्याने विवाहिता छाया कलाल ह्या मुलासह तालुक्यातील शिरसोली येथील आईवडीलांकडे राहत होत्या.

 

५ ऑगस्ट २०२० रोजी विवाहितेची आई जनाबाई दगडू कलाल (वय-५५) रा. शिरसोली प्र.न.चिंचपूरा ता.जि. जळगाव ह्या घरी असतांना विवाहितेचे पती श्याम कलाल, सासु मिराबाई महादेव कलाल, सिमा कलाल, व माई कलाल (पुर्ण नाव महित नाही) सर्व रा. शिरपूर जि.धुळे हे आले. पती श्याम म्हणाला की, “माझ्या मुलाला घेऊन जातो, व छाया तुमच्याकडेस राहू द्या.” यावर जनाबाई कलाल यांनी नकार दिल्याने सासु मिराबाई, सिमा व माई यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली.

भांडण चालू असतांना जनाबाईचे पती दगडू कलाल आणि मुलगा प्रकाश कलाल अश्यांनी सोडवा सोडव केली. जखमी अवस्थेत जनाबाई यांना जळगावातील खासगी रूग्णालयात उचारार्थ दाखल केले. जनाबाई कलाल यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासू व इतर दोघांविरोधा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content