जिल्ह्यात ९७१ कोरोना बाधीत : चोपडा तालुक्यात सुसाट संसर्ग

Jalgaon Corona Updates जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गत चोवीस तासांमध्ये ९७१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात चोपडा तालुक्यात तब्बल २६६ पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ९७१ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहरातील असत. मात्र आज पहिल्यांदाच Jalgaon Corona Updates जळगाव शहरापेक्षा चोपडा तालुक्यात जास्त रूग्ण आढळले आहेत. जळगाव शहरात १९५ पेशंट आढळून आले असून चोपडा तालुक्यातील हाच आकडा २६६ इतका असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर आजच ७५२ रूग्ण बरे देखील झाले असून ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

Jalgaon Corona Updates उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव तालुका-९; भुसावळ-५२; अमळनेर-२५; पाचोरा-१६; भडगाव-२४; धरणगाव-४२; यावल-५४; एरंडोल-९६; जामनेर-४८; रावेर-३७; पारोळा-३७; चाळीसगाव-६३; मुक्ताईनगर-२; बोदवड-२; इतर जिल्ह्यातील-४ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Protected Content