महापौर व उपमहापौर नाथाभाऊंच्या भेटीला !

जळगाव प्रतिनिधी । नवनिर्वाचीत महापौर Jalgaon Mayor सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेऊन शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पहिल्यांदाच आज शहरात दाखल झाले. या अनुषंगाने सायंकाळी नवनिर्वाचीत महापौर Jalgaon Mayor सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची जळगावातील निवासस्थानी भेट घेतली.

जळगाव महापालिकेतील भाजप सदस्यांचा २७ नगरसेवकांचा गट फुटला असून त्यांच्या मदतीनेच सौ. जयश्री सुनील महाजन व कुलभूषण पाटील यांनी अनुक्रमे महापौर आणि उपमहापौरपदी विजय संपादन केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, दोन्ही पदाधिकार्‍यांनी एकनाथराव खडसे यांच्या सोबत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली. याप्रसंगी खडसे यांनी त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.

Protected Content